कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता १० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचा निर्णय
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. तर दुसरीकेडे भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत देखील प्रशाकनाकडून देण्यात आले आहेत. याचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसत आहे. सध्या देशात ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला जात आहे. तर ९ ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही राज्यांमध्ये सुरूवात झाली आहे. अशात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे परीक्षाही उशिरा होणार असल्याचं जाहीर केलं.
त्या म्हणाल्या की, कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता १० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com