आघाडी सरकारच्या कारभारावर खासदार नारायण राणे यांची जोरदार टीका
राज्याच्या विकासावर न बोलता मुलाखतीतून धमकी देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी एक दिवस जनताच तुमच्या पाठीशी हात धुवून लागेल असे सडेतोड उत्तर दिले असून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीलाच ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे या पत्रकार परिषदेत अधोगतीकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मुद्यांचा परामर्श घेतलारत्नागिरीतील शासकीय विश्राम गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू, ऍड बाबासाहेब परुळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com