
सरकारने आपल्या ईडी , सीबीआयसारख्या यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्याविरोधात जुंपावे शिवसेनेचा केंद्राला सल्ला
लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहे, त्यांच्या जोडीने सरकारने आपल्या ईडी (सक्तवसुली संचालनालय), सीबीआयसारख्या यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्याविरोधात जुंपावे, असा खोचक सल्ला शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे. केंद्रातील भाजप सरकार सातत्याने विरोधकांविरोधात ईडी ( आणि सीबीआय या यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. शिवसेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व मुंबई, ठाण्यातील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले, तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.ईडीच्या या कारवाईनंतर केंद्र सरकार ईडीचा वापर राजकीय विरोधकांविरोधात करत असल्याचा आरोप शिवसेनेने यापूर्वीच केला होता. त्यानंतर आज ‘सामना’ या शिवसेनेच्या अग्रलेखामधून शिवसेनेने या कारवाईविरोधात आवाज उठवला आहे.
www.konkantoday.com