कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार -आदर पुनावाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेले होते. या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
www.konkantoday.com