
लोटेतील प्रदूषण न थांबल्यास आंदोलन,असगनी, कोतवली आणि घाणेखुंट गावातील ग्रामस्थ सीईटीपीवर धडकले
लोटेतील जल प्रदूषणाच्या मुद्यावर असगनी, कोतवली आणि घाणेखुंट गावातील ग्रामस्थ शुक्रवारी सीईटीपीवर धडकले. सीईपीटीलगतच्या नाल्यात प्रक्रिया न करता सोडण्यात येणार्या पाण्यामुळे जलप्रदुषणात वाढ झाली आहे. हे पाणी न थांबल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा कोतवलीचे माजी सरपंच संदीप आंब्रे यांनी दिला.
सीईपीटीलगतच्या नाल्यातून रसायनमिश्रित पाणी कोतवलीच्या नदीत येते. या पाण्यामुळे नदीतील जलचर धोक्यात आले आहे. जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत धोक्यात आल्यामुळे गुरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com