
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
करोना विषाणू या आजारावर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करीत आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शनिवारी एक वाजता भेट देणार होते. मात्र त्या वेळेत बदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com
