शासनामार्फत कोविड लस प्राधान्याने डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफप्रमाणे केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनाही मिळावी संघटनेची मागणी
शासनामार्फत कोविड लस प्राधान्याने डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ यांनाच देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदरची लस आम्हाला देखील द्यावी अशी मागणी केमिस्ट असोसिएशनच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केमिस्ट बांधव व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनीही लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा देत कोविड योद्धा म्हणून काम केले आहे. या सर्वांच्या सुरक्षेसाठी त्यांना शासनाने दिलेली कोविड लस मिळावी अशी मागणी रत्नागिरी डिस्ट्रीक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.
www.konkantoday.com