
रत्नागिरी जिल्ह्याचे वनविभागाचे क्रोकोडाईल मॅन, वनरक्षक रामदास खोत यांना सुवर्णपदक
वन विभागात धाडसी कामगिरी करणार्या कर्मचार्यांचा दरवर्षी राज्य शासनामार्फत गौरव केला जातो. वन सेवेतील १८-१९ वर्षासाठीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वन व वन्यजीव संरक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये कार्यरत असलेले वनरक्षक रामदास खोत यांना सुवर्णपदक जाहीर केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात वनविभागात सुवर्णपदक प्राप्त करणारे क्रोकोडाईल मॅन, वनरक्षक रामदास खोत हे पहिलेच कर्मचारी आहेत. खाडी पट्ट्यात मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात खोत यांचा सिंहाचा वाटा आहे. रक्तचंदन तस्करीप्रकरणाच्या तपासातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीची दखल घेत शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. वनविभागामध्ये गेली चौदा वर्ष रामदास खोत हे वनरक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, चिपळूण परिक्षेत्रात व सध्या गुहागर येथे कार्यरत आहेत.
www.konkantoday.com