बंद पडलेले एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने दीड लाखाची ऑनलाइन रक्कम काढून घेऊन फसवणूक
तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे त्यासाठी आपले बँक डिटेल द्यावी असे सांगून खेडशी एकता नगर येथील राहणाऱ्या विनोदिनी कडवईकर यांच्याकडून बँकेच्या खात्याचे डिटेल घेऊन त्या खात्यातून दीड लाख रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे रत्नागिरीजवळील खेडशी येथील राहणाऱ्या विनोदिनी कडवाईकर यांना त्यांच्या मोबाईलवर बँक ऑफ महाराष्ट्र खेडशी नाका येथून बोलत असून आपण बँक मॅनेजर गुप्ता बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे त्याची केवायसी करायची आहे त्याकरता आपला अकाउंट नंबर व मोबाईल वर ओटीपी येईल तो सांगा असे सांगितले त्याप्रमाणे फिर्यादी यांनी आपल्या बँकेच्या खात्याची माहिती सदर इसमाला मोबाइलद्वारे दिली असता त्यांनी फिर्यादीच्या बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यातील रक्कम एक लाख ५०हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले व फिर्यादीची फसवणूक केली याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com