
नवी मुंबईतआता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली
राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्य हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी १० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहेयाशिवाय कुटुंबातील एक सदस्य तपासणीसाठी आला असता कुटुंबातील बाकीचे सदस्यतपासणी साठी आले नसतानाही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह करून पाठवण्यात आले आहेत
www.konkantoday.com