जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाची तारीख येते, तेव्हा तेव्हा यांचा वकील जात नाही -पंकजा मुंडे यांची महाआघाडी सरकारवर टीका

जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाची तारीख येते, तेव्हा तेव्हा यांचा वकील जात नाही, अर्णव गोस्वामीला आत टाकण्यासाठी जेवढी फौज वापरली जाते, ती आरक्षणासाठी केली असती तर? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी सत्तासाधाऱ्यांना विचारला आहे.
पदवीधरांची निवडणूक देखील जातीयवादावर होते आहे. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात कुठला प्रश्न सोडविला? महापोर्टलमध्ये झालेला गोंधळ कधी सुटेल, एमपीएससीच्या तारखा कधी जाहीर होतील यासाठी कधी विचारलं का? अनेक प्रश्न सोडविले नाही. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, मात्र, यांनी त्यावर नेमकं काय केलं विचारा, मिळालेले अॅडमिशन बंद होत आहेत. तरीपण आपण यांना का निवडून देतो? अशाप्रकारे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button