
अजितदादा पवार भाजपावर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता-माजी खासदार निलेश राणें
महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थिर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजपा करीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, पुढील कार्यकालही पूर्ण करेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं, त्यावरून माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
याबाबत निलेश राणेंनी ट्विट करुन म्हटलंय की, अजितदादा पवार भाजपावर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता.
www.konkantoday.com