लांजा एसटी आगारासमोर आराम बस-ट्रक अपघातात चालक जखमी

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या खाजगी आरामबसने समोरून येणार्‍या ट्रकला दिलेल्या धडकेत चालक जखमी झाले आहेत. सदरचा अपघात मंगळवारी लांजा एसटी आगारासमोर घडला असुन त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
चालक हरी महादेव पाटील हे आपल्या ताब्यातील मालवाहक ट्रक घेवून मुंबई ते कुडाळ या मार्गावरून जात होते. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने आरामबस घेवून जाणारे चालक गुरूनाथ विठ्ठल साळगांवकर यांचा वाहनावरील ताबा सुटून सदर अपघात घडला. अपघातात ट्रकचालक हरी पाटील जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button