भारत सरकारने चीनविरोधात आक्रमक पावले उचलली, आता पुन्हा एकदा ४३ अॅपवर बंदी घातली
डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने चीनविरोधात आक्रमक पावले उचलली होती. भारत सरकारने जून आणि सप्टेंबरमध्ये काही अॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा ४३ अॅपवर बंदी घातली आहे.
भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ४३ मोबाइल अॅपची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला धोकादायक असल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भारताच्या सुरक्षा मंत्रालयाकडून माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अॅप आता वापरता येणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे
www.konkantoday.com