लांजा कुंभारवाडी येथे बिबट्याचा फासकीत अडकल्याने मृत्यू
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात लोकवस्ती जवळ बिबट्या आढळल्याचे प्रकार वाढत असतानाच लांजा कुंभारवाडी येथे फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला लांजा कुंभारवाडी येथे वस्ती जवळ असलेल्या वहाळा शेजारी झाडामध्ये डुकरासाठी फासकी लावण्यात आली होती आज सकाळी काही गुराखी या परिसरात गेले असता त्याठिकाणी फासकीत बिबट्या अडकून मृत्यू पावल्याचे आढळून आले या बिबट्याचे वय अंदाजे दोन वर्षे आहे याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे
www.konkantoday.com