रत्नागिरी जिल्हा बँकेच्या मोबाईल एटीएम व्हॅनचे बुधवारी उदघाटन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्ड आर्थिक साक्षरता निधी योजनेंतर्गत मोबाईल ए.टी.एम. व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दि. २५ नोव्हेंबरला सकाळी १० वा. बँकेच्या प्रधान कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आमदार शेखर निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, नाबार्ड पुणेचे चीफ जनरल मॅनेजर एल. एल. रावल हे उदघाटन समारंभाला प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उदघाटन समारंभाला सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे कार्यकारी संचालक सुनिल गुरव व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com