महामार्ग बंद करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे -डॉ. विनय नातू
राष्ट्रीय महामार्ग अडवला तरी कार्यकर्त्यांवर केेसेस होतात. पण गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग गेले ९ ते १० महिने बंद ठेवला. त्यामुणे संबंधित अधिकार्यांवरती केसेस दाखल करण्याची वेळ आली आहे. वरवेलीतील ग्रामस्थांनी श्रमदानाने आणि स्वखर्चाने पर्यायी रस्ता बांधून दिला. त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून रस्ता केला. त्याचबरोबर सत्ताधारी आमदार, पालकमंत्र्यांना हा रस्ता करता आला नाही हेही दुर्दैव असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली.
www.konkantoday.com