वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा एखादा अधिकारी ग्राहकांना विनाकारण त्रास देत असेल तर त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही -ऊर्जामंत्री डॉ . नितीन राऊत
लॉकडाऊन काळातील वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा एखादा अधिकारी ग्राहकांना विनाकारण त्रास देत असेल किंवा वाढीव वीज बिल दुरुस्त करून न देता आधी बिल भरा मग दुरुस्ती करू असे म्हणत असेल तर त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऊर्जामंत्री डॉ . नितीन राऊत यांनी दिला आहे .
लॉकडाऊनमध्ये चार-पाच महिन्यांची एकत्रित विजबिले दिली आहेत. त्यामुळे अवाच्या सवा वीज बिल आल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. त्यामुळे वाढीव वीज बिल आले आहे अशा ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत, त्याच्या वीज वापराची खातरजमा करून बिल दुरुस्त करून देण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.
www.konkantoday.com