निवळी बाजारपेठेत दुकान फोडून छत्तीस हजाराचे कपडे चोरट्यांनी लांबविले
निवळी येथील बाजारपेठेत असलेले रत्नागिरी फॅशन हब या कपड्याच्या दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील शर्ट, टीशर्ट ,पॅण्ट असा छत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला याबाबत आकाश होरंबे यांनी फिर्याद दिली असूनत्यांचे मालकीचे रत्नागिरी फॅशन हब हे निवळी बाजारपेठेत कपड्याचे दुकान आहे अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानांच्या पत्र्यावर चढून पत्रे खोलून दुकानात प्रवेश करून दुकानातील शर्ट टी शर्ट पॅण्ट असा छत्तीस हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले या चोरीबाबत त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल केली आहे
www.konkantoday.com