जिताडा पालनाची नवीन ३१ केंद्रे, तर खेकडा पालनाची नवीन २६ केंद्रे यावर्षी कार्यरत होणार
कांदळवन प्रतिष्ठानमार्फत (मॅन्ग्रूव्ह फाऊंडेशन) सुरू केलेल्या मत्स्यशेती उपक्रमास या वर्षी दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षांपर्यंत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कार्यरत असलेल्या या उपक्रमाचा विस्तार किनारपट्टीवरील इतर जिल्ह्य़ातही झाला असून मत्स्यशेती केंद्रांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे.वनविभागाच्या अखत्यारीतील कांदळवन कक्षाच्या अंतर्गत कांदळवन प्रतिष्ठान काम करते. या वर्षी जिताडा पालनाची नवीन ३१ केंद्रे, तर खेकडा पालनाची नवीन २६ केंद्रे कार्यरत होत असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे उपजीविका विकास विभागाचे उपसंचालक डॉ. सुशांत सनये यांनी दिली. परिणामी किनारपट्टीवर जिताडा पालनाची एकू ण ६६ आणि खेकडा पालनाची २९ केंद्रे नोव्हेंबर अखेपर्यंत कार्यरत होतील. यामध्ये सर्वाधिक सहभाग हा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
www.konkantoday.com