
चिपळूणच्या विक्रांत व अमर आलेकर बंधूंचे सायकलिंगच्या बीआरएम स्पर्धेत यश
मागील आठवड्यापूर्वी २०० किलोमीटरची बीआरएम स्पर्धा पूर्ण केल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चिपळूण सायकलिंग क्लबच्या विक्रांत आलेकर यांनी ३०० किलोमीटरच्या स्पर्धेचे अंतर १४.४० तासात पूर्ण केले तर विक्रांतचे मोठे बंधू अमर आलेकर यांनीही २०० किलोमीटरच्या गटातील स्पर्धेत सहभाग नोंदवून यश प्राप्त करून पुन्हा एकदा आपल्या सायकलिंगची चमक दाखवून शहराचे नाव रोशन केले आहे.
ही सायकल स्पर्धा पुणे-कराड पुणे या मार्गावर घेण्यात आली होती. ज्यामध्ये ३०० किलोमीटरसाठी स्पर्धकांना २० तासाचा कालावधी दिला होता. यामध्ये २८ सायकलपटू सहभागी झाले होते.
www.konkantoday.com