सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनार्यावरील सर्व जलक्रीडा सुरू करण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली
मिशन बिगीन अगेन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यासह खासगी वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे पर्यटकांची पावले सिंधुदुर्गकडे वळत आहेत जिल्ह्यात समुद्र किनार्यावर अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील समुद्र किनार्यावरील सर्व जलक्रीडा सुरू करण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिली आहे. तसे आदेश त्यांनी शुक्रवारी काढले आहेत.
जिल्ह्यातील समुद्र किनार्यांवर विविध जलक्रीडा यात बोटिंग, एटीव्ही रायडिंग चालविले जातात. कोव्हिड – 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने
लागू केलेल्या निर्बंधांमुळे हे सर्व जलक्रीडा प्रकार बंद करण्यात आलेले होते.
www.konkantoday.com