चिपळूण गोवळकोट येथे घरफोडी, एक लाख पासष्ठ हजारांचे दागिने चोरले
चिपळूण शहरातील गोवळकोट आफ्रिन पार्क येथे राहणारे फिर्यादी निजाम पटाईत यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले घरातील एक लाख पासष्ठ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले फिर्यादी पटाईत यांच्या बंद घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने
हत्याराने उघडून घरात प्रवेश करून फ्रिजवर ठेवलेल्या चावीने घरातील कपाट उघडून लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख पासष्ठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले हा चोरीचा प्रकार उघड झाल्यावर चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkatoday.com