
रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य आणि शिक्षण विभाग सज्ज , जिल्ह्यातील ५५९० शिक्षकांची अॅण्टीजेन टेस्ट करण्यात येणार
सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे शैक्षणिक वर्ग सुरु होणार आहेत़. त्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य आणि शिक्षण विभाग सज्ज झाला आहे़ जिल्ह्यातील ५५९० शिक्षकांची अॅण्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना मधुमेह, रक्तदाबसारखे आजार आहेत त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनींग आणि ऑक्सिजन तपासणी करुनच प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
२२मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोनाच्या काळात शाळा महाविद्यालये बंद आहेत. राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी आणि अकरावी बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे़.
www.konkantoday.com