वेलदूरमधील मच्छिमारांच्या अडचणींवर आ. भास्करराव जाधव यांची मध्यस्थी
गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे ७.३० कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी होड्या किनार्यावर आणणे अडचणीचे ठरणार होते. यावर आमदार भास्करराव जाधव यांनी काल संबंधित सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल अशा प्रकारे काम करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या. यामुळे मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com