रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप छत्रपती नगर येथील श्रीशिवशंभू मित्र मंडळाने साकारलेल्या श्री राजहंस गड (येळ्ळूर) किल्ला पाहण्यासाठी गर्दी.
रत्नागिरीशहरातील साळवी स्टॉप छत्रपती नगर येथील श्री शिवशंभू मित्र मंडळाने दिवाळी निमित्त उभारलेली श्री राजहंस गड (येळ्ळूर) किल्ल्याची प्रतिकृती रत्नागिरीकरांचे आकर्षण ठरत आहे. ही प्रतिकृती साकार करण्यासाठी १५ दिवसांच्या अथक परिश्रम घेण्यात आले २५ फुट लांब, १५ फुट रुंद, ४ फुट उंच अशी भव्य प्रतिकृती साकारलेली आहे. यंदा साकारण्यात आलेल्या या किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर, झाडीतील तलाव, शिवरायांची अश्वारूढ मूर्ती, धान्य कोठार, गडावरील तोफा, गोमुखी महा दरवाजा, चौथरा, उद्धवस्त वस्तू, ध्वजबुरुज, भुयारी मार्ग, ढासळलेला बुरुज इ. अभ्यासपूर्वक बाबी दाखवण्यात आल्या आहेत. बेळगाव बाजारपेठ शहराचे रक्षण करण्यासाठी येळ्ळूरचा किल्ला हा भुईकोट बांधण्यात आला आहे, या किल्ल्याचा मुख्य उद्देश टेहळणीचा असल्याने किल्ला आटोपशीर आहे. या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यासाठी अखिलेश बांबाडे, सुधीर मावडी, वैभव पांचाळ, आदेश शेलार, निखील सावंत, प्रसाद सावंत. अजय रेडीज, शौर्य मांजरेकर, अथर्व खेडेकर, तनिष रेडीज, गौरव सावंत, अथर्व शिंदे, श्रीयोग चव्हाण, वेदांत सावंत यांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली. राजहंस गड किल्ल्याची प्रतिकृती पाहण्याची वेळ सायंकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत आहे. किल्ल्याची प्रतिकृती त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील किल्ल्याचे प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे. किल्ला प्रेमी व इतिहास प्रेमी यांची किल्ला पाहण्यास मोठी गर्दी होत आहे या किल्ल्याला रत्नागिरीकरांनी भेट द्यावी असे आयोजकांनी आवाहन केलं आहे
www.konkantoday.com