मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या डिसेंबर -जानेवारी मध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या डिसेंबर-जानेवारमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. शिवाय, त्यासाठी शाखेनुसार पदवी, पदव्युत्तर क्लस्टर कॉलेजची विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणं शक्य नाही त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांची असणार आहे. सोबतच प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षासुद्धा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com