
मुंबई गोवा महामार्गाचे रायगड जिल्हयातील एकूण कामापैकी 40 टक्के अद्यापही अपूर्णच
_गेली तेरा वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. रायगड जिल्हयातील एकूण कामापैकी 40 टक्के अद्यापही अपूर्णच आहे. पनवेल ते इंदापूर हे 84 किमीचे अंतर दोन पॅकेजपैकी पनवेल ते कासू हे 42 किमीचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे आणि कासू ते इंदापूर हे उरलेले 42 किमीचे काम सुरु आहे.या पॅकेजमधील जमीनीवरचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. दोन पॅकेजचे 84 किमीपैकी सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. येत्या डिसेंबरपर्यंत रायगड जिल्हयातील महामार्गाचे काम पूर्ण होईल असे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांनी म्हटले आहे.