कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा उपचारांचा अंदाधुंद आणि सरसकट वापर करू नये-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा इशारा
कोरोनाग्रस्त रुग्णांवर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा उपचारांचा अंदाधुंद आणि सरसकट वापर करू नये, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आज दिला आहे. याबाबत कोरोना रुग्णालये आणि डॉक्टरांसाठी नवे दिशानिर्देशही जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सीपीटी प्लाझ्मा उपचारांच्या अतिरेकाबाबत इशारा देणारे दिशानिर्देश आयसीएमआरने जारी केले. प्लाझ्मा हा केवळ प्रयोग आहे. त्याचा उपचार म्हणून कोरोना रुग्णांवर वापर करू नये, असा इशारा यापूर्वीही देण्यात आला होता. दिल्लीसह अनेक राज्यांनी कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा उपचारांवर भर दिला आहे.
www.konkantoday.com