
आयआरसीटीसीची प्रायव्हेट तेजस एक्सप्रेस बंद होणार
आयआरसीटीसीची प्रायव्हेट तेजस एक्सप्रेस बंद होणार आहे. येत्या २४ तारखेपासून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या सर्व फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र आयआरसीटीसीने लिहिले आहे. केवळ मुंबई – अहमदाबाद नाही तर दिल्ली लखनऊ मार्गावर धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस देखील २३तारखेपासून बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. या दोन्ही एक्स्प्रेस’ला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते आहे. त्यामुळे भारतातील खाजगी ट्रेनचे भवितव्य धोक्यात आले आहे.
www.konkantoday.com