कोकण मार्गावर धावणाऱ्या जामनगर – तिरुनवेली व गांधीधाम – तिरुनवेली या दोन गाड्यांना अतिरिक्त डबा
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणाऱ्या जामनगर – तिरुनवेली व गांधीधाम – तिरुनवेली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून या दोन्ही गाड्या जादा डब्यांच्या धावत आहेत. वाढीव डब्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com