किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ
रत्नागिरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com