
भाटये समुद्र किनारी बुडणाऱ्याचा जीव वाचवणाऱ्यांना पर्यटकांकडून शिवीगाळ
रत्नागिरी -आता सुट्टीच्या हंगामामुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून निघाले आहेत.पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असल्याने ते समुद्रात पोहायला जातात मात्र समुद्राच्या खोलीची त्यांना कल्पना नसल्यामुळे बुडण्याचे प्रकार घडत असतात. काल भाटये किनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले मात्र समुद्रातून सुखरूप बाहेर आल्यानंतर वाचवणाऱ्या तरुणांना पर्यटकांनीच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याने संताप निर्माण झाला आहे. मात्र दरम्यान घटनास्थळी पोलीस आल्याने हे प्रकरण मिटले मात्र यामुळे बुडणाऱ्यांना मदत करावी का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
www.konkantaoday.com