
विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांच्या कंपनीने दररोज २२ कोटीचे दान केले
एका भारतीय उद्योजकाच्या कंपनीने सरासरी दररोज २२ कोटी रुपयांचं दान केलं आहे. या उद्योजकाच्या कंपनीने सीएसआर फंडाच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम समाज हिताच्या कामासाठी खर्च केली आहे. भारतात कोणतीही कंपनी श्रीमंती अथवा फायद्याच्या बाबतीत नंबर एक असली, तरी दान आणि समाज हिताच्या कामासाठी खर्च करण्याच्या बाबतीत अझीम प्रेमजी नंबर एकवर आहेत.
अझीम प्रेमजी यांनी वर्षभरात आपल्या संपत्तीतून ७ हजार ९०४ कोटी रुपये दान केले आहेत. ह्यूरन इंडियाने सर्वात दानशूर व्यक्तींची यादी तयार केली आहे. यात नंबर एकवर आहेत विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी.
भारतातने कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी अझीम प्रेमजी यांनी आर्थिक हातभार लावला आहे.
www.konkantoday.com