प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे रत्नागिरी जिल्ह्य़ातील ५ हजार २४३ लाभार्थी अपात्र

देशातील शेतकऱ्यांना घरबसल्या वर्षांला ६ हजार रुपये देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे रत्नागिरी जिल्ह्य़ातील ५ हजार २४३ लाभार्थी आवश्यक निकष पूर्ण करत नसल्याने अपात्र ठरले आहेत.
या लाभार्थीमध्ये काही आयकरदाते असूनही या योजनेचा लाभ घेतलेल्या २ हजार ४२३ शेतकऱ्यांकडून २ कोटी ११ लाख ५० हजार रुपये वसूल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, तर अन्य काही निकषांनुसार अपात्र ठरलेल्या २ हजार ८२० शेतकऱ्यांकडून ४७ लाख २२ हजार रुपये वसूल करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button