सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आदेश

प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी नुकतीच सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होतीया बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आदेश दिले. ‘वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात आणि जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल.सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तर वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा’, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.या बैठकीला उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button