नाणार प्रकल्प समर्थकांची आता शरदपवारांकडे धाव,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट घालून देण्याची जबाबदारी स्वीकारली
नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी आता प्रकल्प होण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे हा प्रश्न देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली
नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सविस्तर मांडणी केली, तर प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय होऊ शकेल. त्यासाठी दोघांचीही भेट घालून देण्याची जबाबदारी मी घेतो, असे आश्वासन देतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना सांगितले.
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह अविनाश महाजन, विद्याधर राणे, जुनेद मुल्ला, सचिन आंबेरकर, निलेश पाटणकर, केशव भट, आनंद जोशी, प्रमोद खेडेकर, सचिन शिंदे यांनी रविवारी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री पाटील यांची भेट घेतली. दरम्याने रत्नागिरी जिल्हा क्रेडाईतर्फे दीपक साळवी व राजेश शेटये यांनीही रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणावर समर्थन वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा काढली जावी, अशी मागणी त्या निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळे रिफायनरी समर्थकांनी परत एकदा जोर केला आहे
www.konkantoday.com