
वयोवृद्ध सायकलस्वाराला धडक देणार्या त्या कार चालकाचा शोध सुरू
भरधाव वेगातील कार चालकाने एका वयोवृद्ध सायकलस्वाराला धडक देवून अपघात झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गाच्या वालोपे येथील हॉटेल एकविरा परिसरात घडली होती. या अपघातानंतर पसार झालेला कार चालक सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.शंकर बाबू कदम (७२, वालोपे) असे जखमी झालेल्या वयोवृद्ध सायकलस्वाराचे नाव आहे. शंकर कदम यांना महाराष्ट्र गादी कारखाना नाईक कंपनी येथे जायचे असल्याने ते मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील हॉटेल एकविराच्या समोर सायकलने रस्ता ओलांडत होते.याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात कारने त्यांना धडक दिली होती. यात कदम जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कारचालक न थांबता तो पसार झाला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या कारचालकाचा शोध घेत आहेत. www.konkantoday.com