रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे विमानतळ येथील स्टॉप जवळ गांजा विक्री करताना तरुणाला अटक

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे विमानतळ येथील स्टॉप जवळ शहर पोलीसांच्या डिबी पथकाने सापळा रचून गांजाविक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. त्याच्याकडून १२ हजार रुपयांचा १ किलो गांजा आणि रिक्षा असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवलिंगप्पा मल्लेशी पुजारी ( रा. क्रांतीनगर, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी डिबी पथकाला विमानतळ येथील स्टॉप जवळ पुजारी गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button