
चिपळुण नगराध्यक्षांच्या बडतर्फी मागणी प्रकरणी,
आज रत्नगिरीत सुनावणी
चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या १९ कामांवर आक्षेप घेत त्यांच्या बडतर्फीची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. या मागणीवर आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष खेराडे यांनी महिला आयोग व उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
www.konkantoday.com