दिल्लीत गेल्या आठवड्यापासून दररोज ५ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ
देशात गेले काही दिवस कोरानाचा प्रादुर्भाव थोडासा कमी झाला आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट येणार असे तज्ज्ञांनी सांगितले होते. दरम्यान, देशात रुग्ण वाढीचा दर कमी होत असताना दिल्लीत मात्र उलट परिस्थिती आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यापासून दररोज ५ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आता डॉक्टरांची चिंता वाढली असून देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येईल का? यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत आहे, मात्र गाफिल राहून चालणार नाही. दिवाळीतील गर्दी आणि हिवाळ्यातील थंडीची तिव्रता वाढली तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वेगाने वाढ होईल, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.
www.konkantoday.com