
समित्र नगर पासून राजापूरकर कॉलनी पाईप फॅक्टरी नाक्या पर्यन्त रस्ता पाईपलाईन साठी खोदला, खोदलेल्या चरा मुळे नागरिकांना नाहक त्रास
रत्नागिरी शहरातील समित्र नगर पासून राजापूरकर कॉलनी पाईप फॅक्टरी नाक्या पर्यन्त संपूर्ण रस्ता नविन पाईप लाईन टाकाण्यासाठी १५ दिवसा पूर्वी खणण्यात आला आहे त्यामधे पाईप न टाकताच तसाच उखरुन ठेवल्यामुळे मुळातच अरुंद असलेला हा रस्ता खणण्यात आल्यामुळे समोरासमोरून आलेली दोन वाहने पास होत नाहीत त्यामुळे राजापूरकर कॉलनी येथिल रविवायांशाना त्रास सहन करावा लागत आहे . मा मुख्याधिकारी रनप यानी याकडे त्वरीत लक्ष द्यावे तसेच रस्ते खणल्या नंतर ते पूर्ववत करण्यात यावेत अशी मागणी होत आहे रत्नागिरी शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर हीच अवस्था आहे पाईपलाईन घालण्यासाठी चर काढून झाल्यानंतर मातीचे ढिगारे तसेच कायम ठेवले जात आहेत या मार्गावरून नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक जात येत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com