बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता

कोरोनाच्या संकटकाळात प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या एस.टी महामंडळानं बेस्टसाठीही मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळालं. बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिले आहेत.
मागील दोन महिने १ हजार बसेस साठी सुमारे४ हजार ५०० पेक्षा अधिक एस.टी. कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडुन जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button