
भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी स्वखर्चाने दिली स्टेट बँक काँलनी परिसरात वायफाय सुविधा अटल वायफाय झोन
भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी
रत्नागिरी शहरातील स्टेट बँक काँलनी परिसरात स्वखर्चाने नागरिकांना WiFi उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.देसाई हे ऑटोमोबाइल इंजिनीअर असून त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड आहे
अटलबिहारी यांच्या प्रेरणा स्थानातून त्यांनी स्टेट बँक काँलनी परिसरातील काही भागात अटल वायफाय झोन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दि.२५ डिसेंबर रोजी ११वा. वाजता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत शहराध्यक्ष सचिन करमरकर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन व भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विक्रम जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
स्टेट बँक परिसरातील जनतेला लॉगिन केल्यावर हे वायफाय उपलब्ध होणार आहे देसाई यांच्या या उपक्रमामुळे या परिसरातील नेटीझन्सना तसेच युवा पिढीला या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.देसाई यांनी स्वखर्चाने उभारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com




