
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे काल सकाळी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पुन्हा एकदा जनावरांवर बिबट्याचा हल्ला
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे काल सकाळी बिबट्या जेरबंद झाला झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काल दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान खर्डेवाडी येथील मारुती आत्माराम खर्डे यांच्या पाडीवर हल्ला करून जखमी केले. परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
काल सकाळी पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्या सापडल्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. हा आनंद व्यक्त करत असतानाच काल दुपारी मारुती खर्डे यांनी आपली गाय व वासरू नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या जंगलात सोडले होते. दुपारी चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे गाय वासरू आणण्यासाठी गेले असता वासरावर मोठी जखम झाल्याचे लक्षात आले.अजूनही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र दिसत आहे.
www.konkantoday.com