
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. तसेच सरसकट शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही.
www.konkantoday.com