महाविकास आघाडीच्या तक्रारींची सुनावणी सुरू असताना चिपळूणच्या नगराध्यक्षांची उच्च न्यायालयात धाव
चिपळूण नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी गेल्या साडेतीन वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामे केली असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असे आरोप करीत महाविकास आघाडीने जिल्हाधिकार्यांकडे बेकायदेशीरपणे केलेल्या १९ विकासकामांबाबतचे पुरावे सादर केल्याने व त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर केल्याने नगराध्यक्षा खेराडे यांनी आपला मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकार्यांकडे त्यांची सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यासाठी त्यांनी धाव घेतल्याने आता नगराध्यक्षांनी आपल्या बचावासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयावरच नगराध्यक्षांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा सुरू आहे.
www.konkantoday.com