
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन पॅसेंजर रेल्वे एक्सप्रेस करण्याच्या निर्णयाला चिपळूण मधून विरोध
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांपैकी दोन पॅसेंजर रेल्वे एक्सप्रेस करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांच्या दृष्टीने महामंडळाचा हा निर्णय त्रासाचा आणि आर्थिक भुर्दंड लावणारा आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातून या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी मडगाव, मडगाव रत्नागिरी आणि दिवा सावंतवाडी, सावंतवाडी दिवा या दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या धावतात. या रेल्वेने 50 रुपयात चिपळूणातून मुंबई आणि मुंबईतून चिपळूणला प्रवास करता येतो. सामान्य लोकांसाठी ही रेल्वे फायद्याची आहे. चिपळूण तालुक्यातील आरवली, कामथे, सावर्डे आणि खेड तालुक्यातील अंजनी येथील रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबते.चिपळूण आणि खेड तालुक्यातील शेकडो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. नोकरदार वर्गासाठी सुद्धा ही रेल्वे फायद्याची आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्या एक्सप्रेस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीटदर वाढणार आहे. त्याशिवाय लोकल स्थानकावर ही रेल्वे थांबणार नाही. आरवली, कामथे, सावर्डे, अंजनी या स्थानकावर ही रेल्वे थांबणार नाही. खेड, चिपळूण आणि रत्नागिरी वगळता जिल्ह्यातील इतर लोकल स्थानकावरही ही रेल्वे थांबणार नाही. तिकीटदरही वाढणार आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने हे गैरसोयीचे आहे
www.konkantoday.com