छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित प्रतिक्षालय सुरू
मुंबईहून लांब पल्ल्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नवे वातानुकूलित प्रतिक्षालय सुरू झाले आहे. प्रौढांना १०रूपये तर ५ ते १२ वयोगटातील मुलांना ५रूपये प्रती तास दराने प्रतिक्षालयाची सुविधा मिळणार तर ५ वर्षाखालील बालकांना कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही.
विमानतळावरील प्रतिक्षालयाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या प्रतिक्षालयात अत्याधुनिक सोईसुविधा देण्यात आल्या आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १४ते १८जोडल्या जाणाऱ्या कॉरिडॉरजवळ हे प्रतिक्षालय सुरू करण्यात आले आहे.
सार्वजनिक खासगी भागेदारीतून प्रतिक्षालय सुरू करण्यात आलेल्या प्रतिक्षालयात प्रवाशांना सुविधा देताना, प्रतिक्षालयामध्ये सुरूवातीला सुरक्षा अनामत म्हणून ५० रूपये घेतले जाते.तर प्रत्यक्षात १० रूपये प्रति तास सेवा दिली जाते. त्यानंतर प्रवाशांना परत जातांना अनामत रक्कम परत केल्या जाते असे नम: प्रतिक्षालय व्यवस्थापनाने सांगितले आहे.
www.konkantoday.com