
आता रिफायनरी उभी करण्यासाठी नाणार राजापूर हाच पर्याय ,कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन यांचे प्रतिपादन
रिफायनरी प्रकल्प राजापुरातून रायगडला हलविण्याच्या हालचाली सुरू असताना आता या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी ५ हजार एकर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसरात रिफायनरी होण्याच्या आशा धुसर झाल्या असून, आता राजापूर हा एकमेव पर्याय राहिला आहे.
ठाकरे सरकारने राजापूरच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राजापुरात रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन यांनी केले .आता रिफायनरीसाठी राजापूर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यासाठी स्थानिकांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे शासनाला सादर केली आहेत. सध्या रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता कितीतरी पटीने वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिफायनरी मार्गी लागावा, अशी येथील जनतेची मागणी आहे. ठाकरे सरकारने या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.
www.konkantoday.com